मातीची जादू
“एकमेव जादुई वस्तू जी मृत्यूला जीवनात रुपांतरीत करू शकते.”
– सद्गुरू
माती वाचवा चळवळ संपूर्ण मानवजातीला एकत्र करून मातीची जादू जिवंत ठेवण्याबद्दल आहे.
Watch The Save Soil Documentary
पण...
माती म्हणजे नेमकं काय आणि ती काय करते?
आपल्याला मातीबद्दल किती माहित आहे ते एका मजेशीर क्वीज मधून पाहूया.
प्रश्न 1 / 6
माती म्हणजे ______ .
माती हा आपल्या जीवनाचा आधार आहे. पण...
शेती, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे मातीचा वरचा थर अतिशय जलद गतीने नापीक आणि नष्ट होत आहे. जागतिक स्तरावर, ५२% शेतजमीन आधीच निकृष्ट झाली आहे. पृथ्वी संकटात आहे. मातीच्या ऱ्हासाचे सध्याचे प्रमाण असेच चालू राहिल्यास, ज्यामुळे आपल्याला माहिती असलेल्या जीवनाचा हा अंत असेल.
खुपच नित्कृष्ट
नित्कृष्ट
स्थिर
काही झाडं- झुडपं नाही.
आपली पृथ्वी संकटात आहे
अन्न टंचाई
येत्या 20 वर्षांत, ९.३ अब्ज लोकांसाठी आपण आतापेक्षा ४०% कमी अन्न निर्माण करू.
निकृष्ट माती म्हणजे निकृष्ट दर्जाचे पोषण. आजच्या फळं आणि भाज्यांमध्ये आधीच ९०% कमी पोषणतत्त्वे आहेत.
२ अब्ज लोक पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे अनेक रोगांचा सामना करत आहेत.
पाणी टंचाई
नापीक माती पाणी शोषून पाण्याचा प्रवाह नियमित करू शकत नाही.
पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने पाणी टंचाई, दुष्काळ आणि पूर यांसारख्या आपत्ती उद्भवतात.
सेंद्रिय घटक असलेली माती तिच्या वजनाच्या ९०% एवढे पाणी धरून ठेऊ शकते आणि ते हळूहळू सोडू शकते. दुष्काळग्रस्त भागांसाठी हे एक मोठी मदत ठरते.
जैव विविधेतेचे (बायो डायव्हरसिटी) नुकसान
वैज्ञानिक सांगत आहेत, की दरवर्षी विविध जीवांच्या जवळपास २७००० प्रजाती त्यांचे मूळस्थान नष्ट होत असल्यामुळे नामशेष होत आहेत.
या संकटाने अशी पातळी गाठली आहे, की ८०% कीटक बायोमास (इंसेक्ट बायोमास) नष्ट झाले आहे.
जैव विविधता (बायो डायव्हरसिटी) गमावल्यामुळे, मातीचे मूळस्वरुप विस्कळीत होते आणि पुनरुज्जीवनाची क्षमता निघून जाते.
वातावरण बदल
मातीमध्ये साठवलेला कार्बन जिवंत वनस्पतींच्या ३ पट आहे आणि वातावरणाच्या 2 पट आहे. याचा अर्थ हवेतला कार्बन कमी करण्यासाठी, माती अत्यंत महत्त्वाची आहे.
जर जगातील माती पुनरुज्जीवित झाली नाही, तर त्यामुळं ८५० अब्ज टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात पसरेल ज्यामुळे हवामान बदलाचा धोका संभवतो. हे मानवाने गेल्या ३० वर्षांत केलेल्या सर्व उत्सार्जनापेक्षा जास्त आहे.
उदरनिर्वाहाच्या साधनांचे नुकसान
माती निकृष्ट होत चालल्यामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत.
जगभरातील ७४% गरीब लोकसंख्या मातीच्या हानीमुळे थेट प्रभावित झाली आहे.
असा अंदाज आहे, की माती नामशेष होत चालल्यामुळे जगाला दरवर्षी १०.६ ट्रीलियन अमेरिकन डॉलर एवढा तोटा होत आहे.
संघर्ष आणि स्थलांतर
२०५० पर्यंत, लोकसंख्येतील वाढ आणि अन्न आणि पाणी टंचाईमुळे १ अब्ज लोकांना इतर देशांमध्ये स्थलांतरीत व्हावे लागू शकते.
1990 पासून आफ्रिकेतील ९०% पेक्षा अधिक युद्धांमध्ये आणि संघर्षांमध्ये जमिनीच्या समस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
फ्रेंच क्रांती पासून ते अरब स्प्रिंग पर्यंत, अन्न खाद्याचे वाढते दर मोठ्या हिंसक चळवळींसाठी कारणीभूत ठरलेले आहेत.
माती: एक समग्र समाधान
जवळजवळ प्रत्येक मोठे पर्यावरणीय संकट हे काही प्रमाणात किंवा स्वरुपात, मातीच्या ऱ्हासाचा परिणाम किंवा लक्षण असते. त्याचप्रमाणे, जवळजवळ प्रत्येक पर्यावरणीय समस्या किंवा आव्हान हे सुपीक मातीची निर्मिती करून सोडवले जाऊ शकतात.
खरं तर, आपण आपल्या पर्यावरणाचे सर्व पैलू एकत्रितपणे न सोडवता, कोणताही एक पैलू सोडवू शकतो असा विचार करणे ही एक चूक आहे, कारण पर्यावरण यंत्रणेचा कोणताही पैलू एकट्याने कार्य करत नाही. कोणताही उपाय परिपूर्ण नाही, जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की जीवन ही एकच गुंतागुंतीची घटना आहे, जी एकसंधपणे घडत आहे. अनेक प्रकारे, माती हे मूळ आधार आहे ज्यामुळे जीवन घडते. आपण माती नित्कृष्ट होण्याची समस्या सोडवल्यास आपल्याकडे इतर पर्यावरणीय समस्या सोडवण्याची उत्तम संधी आहे.
तज्ञ काय म्हणतात?
विज्ञान काय सांगते?
S.O.S - आपली माती वाचवा?
माती चे व्यवस्थापन
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
जैवविविधता
जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे २४ अब्ज टन सुपीक माती आणि २७००० जैव-प्रजाती नष्ट होत आहेत.
संयुक्त राष्ट्राचा अहवाल: जगातील शेत जमीनी नापीक होण्याच्या उंबरठ्यावर आल्या आहेत.
वातावरण बदल
जगातील वातावरण बदलाने त्रस्त आणि प्रदूषणाने नापीक शेती आणि कृषी यंत्रणा, अन्न निर्मितीसाठी ताबडतोब शाश्वत पद्धतींकडे वळले पाहिजे...
हे माती (ओह सॉइल)
या मातीचा गंध
कुठेतरी मला फुलांच्या घमघमाटाहूनही
अधिक भावतो !
या माती मध्ये
साठलेली शक्ती आणि जाणीव
निराळ्याच
भावनांच्या लाटा उसळून आणते
भावना, त्याही एका व्यक्तीच्या
अश्या नाही, तर माझ्या संपूर्ण प्रजातीच्या
, जी संवेदनाशून्य होऊन बसली आहे,
तिचं पोषण करणाऱ्या आणि शेवटी आपल्याच कवेत
पुन्हा सामावून घेणाऱ्या माते प्रति.
तिच्यावरून अलगद अनवाणी चालताना
मी पुरता हरून जातो.
अश्या तीव्र भावना दाटून येतात,
ज्या वर्णनातीत आहेत
माझं जीवन, ही माती !
सद्गुरूंची कविता
चला, हे घडवून आणूया!